राजकीय

राष्ट्रवादीच्या टाळीला भाजपची साथ – शेखर जोशी

नागालँड मध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (एन डी पी पी) आणि भाजप यांच्या निवडणूकपूर्व युतीला स्पष्ट बहुमत मिळालेले असतानाही तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोढणे भाजप कशासाठी गळ्यात अडकवून घेत आहे? की भविष्यात महाराष्ट्रातील सत्ता सोपानही नागालँडच्या मार्गावरून जाणार असल्याची ही चुणूक आहे?

नगालँडमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार निवडून आले असून राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्ष म्हणून काम न करता आता सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. नागालँड राज्याच्या व्यापक हितासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आले.

तळे राखेल तो पाणी चाखेल – शेखर जोशी

आमचे आणि नागालँडचे मुख्यमंत्री रिओ यांचे जुने संबंध आहेत म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत मात्र आमचा पाठिंबा भाजपला नाही असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे आहे. नागालँडच्या विधानसभेत एकूण ६० जागा असून स्पष्ट बहुमतासाठी ३१ जागांची आवश्यकता होती. एन डी पीपी आणि भाजप यांच्या निवडणूकपूर्व युतीला एकूण ३७ जागा मिळाल्या‌. यात एनडीपीपीएच्या २५ आणि भाजपच्या १२ अशा ३७ जागा मिळून रिओ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला.

तुझ्या गळा माझ्या गळा… शिंदे- फडणवीसांना अजितदादांचा लळा!

एनपीपी या पक्षाला पाच जागा तर नागा पिपल फ्रेंड, लाजप (रामविलास पासवान) आणि रामदास आठवले यांचा आरपीआय पक्ष यांना प्रत्येकी दोन जागा मिळाल्या. एक जागा जेडीयू ला मिळाली
म्हणजे साठ जागांच्या नागालँड विधानसभेमध्ये ३७ जागा इतके स्पष्ट बहुमत एन डी पी पी आणि भाजपला मिळालेले असतानाही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्हाला सत्तेत सहभागी व्हायचे आहे सांगून सत्तेमध्ये प्रवेश केला आहे. एकीकडे संपूर्ण देशात भाजप विरोधात सर्व विरोधी पक्षांचे ऐक्य व्हावे म्हणून हेच शरद पवार पुढाकार घेतात आणि नागालँडमध्ये विरोधात न बसता सत्तेत सहभागी होतात. कसबा विधानसभा पोटनिवडणूकीत काँग्रेसचे धंगेकर विजयी झाल्यानंतर, देशात आता बदलाची सुरुवात झाली आहे, अशी प्रतिक्रियाही शरद पवार यांनी व्यक्त केली होती.

मुंबई महापालिका हेच लक्ष्य, अंधेरी पोटनिवडणुकीकडे दुर्लक्ष – शेखर जोशी

नागालँड मध्ये एन डी पीपी आणि भाजपच्या सत्तेत सहभागी होऊन राष्ट्रवादी काँग्रेसने या बदलाची सुरुवात केली असावी. २०१४ मध्ये महाराष्ट्रात भाजपला भाजपने न मागता राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला. महाराष्ट्रावर पुन्हा निवडणुकीचे संकट नको म्हणून आम्ही हा विनाअट पाठिंबा देतो आहोत, असे शरद पवार यांनी तेव्हा सांगितले होते.

शिवसेनेच्या संकल्पनेचे खरे जनक आचार्य अत्रेच’ – शेखर जोशी

त्यानंतर २०१९ मध्ये भाजप आणि अजित पवार यांचा शपथविधी झाला पण काही तासांत हे सरकार कोसळले. त्या नंतर काही दिवसांपूर्वी या प्रकरणी आधी जयंत पाटील, त्यावर शरद पवार, मग देवेंद्र फडणवीस आणि नंतर पुन्हा शरद पवार अशी वक्तव्ये झाली. केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी सरकार अवघ्या एका मताने काही वर्षांपूर्वी कोसळले होते. वाजपेयी यांचे भाषण ऐकल्यावर र सभागृहात बसलेल्या एकाही सदस्याला भाजपला पाठिंबा द्यावा अशी बुद्धी झाली नाही.आता नागालँडच्या बाबतीत पवार यांनी आमचा पाठिंबा रिओ यांना आहे, आमचे आणि त्यांचे जुने संबंध आहेत. आमचा पाठिंबा भाजपला नाही, असे सांगितले मग हेच शहाणपण त्यांना वाजपेयी यांचे सरकार एका मताने पडले तेव्हा का सुचले नाही? आम्ही भाजपला पाठिंबा देत नाही पण वाजपेयी यांना पाठिंबा देत आहोत, असे पवार म्हणू शकले असते.

दोन्ही काँग्रेसशी करता संग, शिवसेनेचा झाला अंत

पण मात्र आपण आता भाजपबरोबर गेलो तर आपल्या पुरोगामी व्यक्तिमत्त्वाला ( ढोंगी,बेगडी) तडा बसेल आणि कदाचित आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी ते धोकादायक ठरेल अशी भीती पवार यांना वाटली असावी. आणि त्यामुळेच पवार यांनी तेव्हा भाजपला पाठिंबा दिला नसावा. पण नियती कशी असते पाहा आहे, ज्या भाजपला शरद पवार यांच्यसह अन्य राजकीय पक्षांनी नाकारले तोच भाजप २०१४, २०१९ मध्ये सर्वांच्या डोक्यावर बसला आहे. यूपीआता २०२४ मध्येही हॅट्रीक होणार हे निश्चित एकूण काय पवार यांचे गणित तेव्हा चुकले ते चुकलेच. नाहीतर आज शरद पवार यांचे चित्र वेगळे दिसले असते.

विश्वासार्हता गमावलेल्या शरद पवार यांच्यावर विश्वासच कसा ठेवलात?

प्रश्न असा आहे की पवार यांच्यासारख्या बेभरोशी, अनाकलनीय आणि विश्वासार्हता गमावलेल्या माणसांबरोबर महाराष्ट्रात २०१९ मध्ये एकदा हात पोळल्यानंतर आता नागालँडमध्ये गरज नसताना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचे हे लोढणे कशासाठी गळ्यात अडकवून घेत आहे।महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला गेल्या वेळेसारखे यश मिळणार नाही अशी भीती भाजपला वाटतेय? त्याची बेगमी म्हणून किंवा आताही अजित पवार व काही आमदारांना भाजपकडे पाठवून नागालँडसारखे महाराष्ट्रातही बदलाचे वारे पवार यांना सुरू करायचे आहेत?

नाहीतर ‘सोमनाथ’चीही ‘बाबरी’ झाली असती – शेखर जोशी

राष्ट्रवादीने नागालँडमध्ये भाजपला टाळी दिली आणि भाजपने टाळीला टाळी दिली. रिओ व आम्हाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे, आम्हाला हा पाठिंबा नको, तुम्ही विरोधी पक्षातच बसा, असे मोदी,शहा यांनी म्हटल्याचे अद्याप तरी पाहिले नाही, वाचले नाही, म्हणजे ते वरच्या पातळीवर बोलून आणि ठरवून झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेली ही टाळी भाजपने टाळायला हवी होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *