उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार
मुंबई दि.०८ :- उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या ( ९ मार्च) राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करणार आहेत. वित्त आणि नियोजन मंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रथमच राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Dombivali ; फुगे मारण्याच्या वादातून दोन गटात राडा (Video)
महापलिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुका या वर्षी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात काही विशेष घोषणा केल्या जातील का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
वक्तव्यावर खुलासा करण्यासाठी आणखी मुदतवाढ मिळावी- संजय राऊत
मुंबई, ठाणे, नागपूर या शहरांसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली जाईल का? कृषी, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सिंचन, ऊर्जा आदी विभागांना अर्थसंकल्पात झुकते माप मिळण्याची शक्यताही राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.