शिवसेनेच्या संकल्पनेचे खरे जनक आचार्य अत्रेच’ – शेखर जोशी

शिवसेनेच्या संकल्पनेचे खरे जनक आचार्य अत्रेच आहेत असे ठाम आणि स्पष्ट प्रतिपादन आचार्य अत्रे यांच्या कन्या, ज्येष्ठ कवयित्री दिवंगत शिरीष पै यांनी बारा वर्षांपूर्वी केले होते.

आचार्य अत्रे यांच्या कन्या,

ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै

त्यांच्याशी झालेल्या संवादावर आधारित माझी विशेष बातमी लोकसत्ता च्या १९ नोव्हेंबर २०११ च्या अंकात प्रसिद्ध झाली होती.

निवडणूक चिन्हांचा रंजक प्रवास – शेखर जोशी

निमित्त होते आचार्य अत्रे यांच्या मराठा दैनिकाच्या डीव्हीडीचे. ‘मराठा’ दैनिकाचे सर्व अंक डिव्हिडीवर उपलब्ध करून देण्यात येणार होते.( १५ नोव्हेंबर १९५६ ते १९६० च्या डिसेंबर अखेपर्यंत).

शिल्लक सेनेचा रडगाणे मेळावा – शेखर जोशी

आचार्य अत्रे यांचे नातू ( शिरीष पै यांचे सुपुत्र) ॲड.राजेंद्र पै याविषयीची जबाबदारी सांभाळणार होते. या निमित्ताने शिरीष पै यांची भेट घेतली होती. त्या वेळी ‘मराठा’च्या आठवणींना उजाळा देताना शिरीष पै यांनी ‘शिवसेनेच्या संकल्पनेचे खरे जनक माझे वडील आचार्य अत्रे हेच असल्याचे स्पष्ट प्रतिपादन केले होते.

भाषण नव्हे वाचन – शेखर जोशी

२५ जुलै १९५९ या दिवशी ‘मराठा’ दैनिकात ‘शिवसेना’याच नावाने अग्रलेख प्रसिद्ध झाला. समाजापुढे असलेल्या समस्या सोडविण्यासाठी मराठी तरुणांनी पुढाकार घेऊन एकत्र यावे आणि त्यासाठी ‘शिवसेना’ या नावाने संघटना स्थापन करावी, असे आचार्य अत्रे यांनी सुचविले होते.

काही बोलायचे आहे पण आत्ता बोलणार नाही – राज ठाकरे यांच्या ‘ट्विट’मुळे विविध तर्क- वितर्क

छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांचे संघटन केले आणि त्यातूनच पुढे हिंदूवी स्वराज्याची निर्मिती झाली. स्वतंत्र विचारांच्या मराठी तरुणांनी या मावळ्यांप्रमाणे एकत्र येऊन संघटित व्हावे, असे वडिलांचे म्हणणे असल्याचे शिरीषताई म्हणाल्या होत्या.

बॉलीवूडची विकृती, भारतीय संस्कृतीची नालस्ती – शेखर जोशी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्र सेवादल या संघटनांप्रमाणे मराठी तरुणांची बिगर राजकीय विचारांची संघटना स्थापन करावी आणि त्यांनी एकत्र येऊन काम करावे, असा विचार त्यांनी मांडला असल्याचेही शिरीषताईंनी सांगितले होते.

मुंबई दूरदर्शनची पन्नाशी – शेखर जोशी

शिरीष पै यांच्या या ठाम आणि स्पष्ट प्रतिपादनानंतर शिवसेनेच्या संकल्पनेचे खरे जनक आचार्य अत्रे हेच आहेत हे स्पष्ट होते. दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जे सांगितले ते अर्धसत्य होते.

हलाल सक्ती विरोधी परिषदेत ‘हलाल जिहाद ?’ या ग्रंथाचे लोकार्पण !

मराठी तरुणांची अशी संघटना स्थापन करून त्याचे नाव ‘शिवसेना’ असावे ही मूळ संकल्पना आचार्य अत्रे यांचीच होती, प्रबोधनकरांनी त्यापासून प्रेरणा घेतली हे ही उद्धव ठाकरे यांनी आवर्जून सांगायला हवे होते.

लोकसत्तामध्ये १९ नोव्हेंबर २०११ च्या अंकात प्रसिद्ध झालेली माझी विशेष बातमी

Leave a Reply

Your email address will not be published.