सर्वसामान्यांच्या आरोग्यावरील खर्चात जन औषधी केंद्रांमुळे मोठी बचत – राज्यपाल रमेश बैस
मुंबई दि.०८ :- जन औषधी केंद्रामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावरील खर्चात मोठी बचत होत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. भारतीय जन औषधी दिवस आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपाल बैस बोलत होते. देशातील ७६४ पैकी ७४३ जिल्ह्यात जन औषधी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.या केंद्रात १७५९ औषधे आणि २८० सर्जिकल उपकरणे उपलब्ध आहेत.
मुंबईसह ठाणे, रायगड भागात तापमान वाढणार कोकणात उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा
येत्या वर्ष अखेर पर्यंत देशभरात सुमारे दहा हजार जन औषधी केंद्र सुरू करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे, असेही राज्यपाल बैस यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ .भारती पवार म्हणाल्या, जनऔषधी केंद्रामधून दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे अनेक रुग्णांच्या पैशांची बचत होत आहे. औषधांच्या किंमती कमी झाल्यामुळे अनेक औषधें सामान्य नागरिकांच्या आवाक्यात आली आहेत. जन औषधी केंद्र सुरू करण्यासाठी युवकांनी पुढे यावे. सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले, करोना कालावधीत ‘आशा’ सेविकांनी खूप चांगले काम केले. त्यांच्या मानधनात वाढ करण्याची आवश्यकता आहे.
Dombivali ; फुगे मारण्याच्या वादातून दोन गटात राडा (Video)
जास्तीत जास्त नागरिकांना औषधोपचार मिळावेत यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा वाढवण्याचा विचार व्हावा. जनऔषधी ज्योती, जनऔषधी सर्वश्रेष्ठ सिंबायोसिसचे अधिष्ठाता डॉ. विजय सागर, जनऔषधी मित्र म्हणून डॉ. तुषार पालवे यांना तर ‘आशा’ कार्यकर्त्या सुशिला भंडारे , नेत्रतज्ञ डॉ. नम्रता सोनवणे, स्त्री रोग तज्ञ डॉ. पूजा भुतडा यांचा उत्कृष्ट काम केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सचिव नवीन सोना यांनी प्रास्ताविक केले तर अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त भूषण पाटील यांनी आभार मानले.