महिला दिनानिमित्त बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयासमोर आकर्षक सेल्फी पॉईंट
मुंबई दि.०८ :- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बृहन्मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने महानगरपालिका मुख्यालया समोरील ‘सेल्फी पॉईंट’वर अनोख्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त केली आहे. गुलाब, शेवंती, डेझी आणि जिप्सोफीला या फुलांचा वापर करून हृदयाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.
सर्वसामान्यांच्या आरोग्यावरील खर्चात जन औषधी केंद्रांमुळे मोठी बचत – राज्यपाल रमेश बैस
ही प्रतिकृती महिला दिनाच्या निमित्ताने दिवसभर व संध्याकाळी उशिरापर्यंत ‘सेल्फी पॉईंट’वर असणार आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जीतेंद्र परदेशी यांनी दिली. ही प्रतिकृती तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली बहुतांश फुले महापालिका उद्यानांमधील आहेत.
मुंबईसह ठाणे, रायगड भागात तापमान वाढणार कोकणात उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा
तसेच तयार करण्यात आलेली प्रतिकृती ही तब्बल ८ फूट उंचीची आणि ५ फूट लांबीची आहे. ही प्रतिकृती तयार करण्यासाठी सुमारे ५०० पेक्षा अधिक गुलाब आणि तेवढ्याच संख्येतील शेवंतीच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे. तर डेझी आणि जिप्सोफिला या फुलांचे प्रत्येकी १० गुच्छ यासाठी वापरण्यात आले असल्याचे परदेशी यांनी सांगितले.