मुंबईसह ठाणे, रायगड भागात तापमान वाढणार कोकणात उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा
मुंबई दि.०८ :- राज्यातील तापमान ४ ते ६ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. उद्या ( ९ मार्च ) रोजी कोकणात उष्णतेच्या लाटेचा तसेच ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील काही भागातही तापमान वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Dombivali ; फुगे मारण्याच्या वादातून दोन गटात राडा (Video)
फेब्रुवारी महिन्यात तापमानात प्रचंड वाढ झाली होती. मात्र ५ ते ८ मार्च दरम्यान राज्यभरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला. यामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला. राज्यातील कमाल तापमानात मोठी वाढ होणार आहे. तर विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.