राजकीय पक्षांच्या कार्यालयाबाहेरील आसनेही हटविली
मुंबई दि.०६ :- बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयातील राजकीय पक्षांच्या कार्यालयांना टाळे ठोकल्यानंतर आता या कार्यालयांबाहेरील आसनेही पालिका प्रशासनाने हटविली आहेत. गेल्या आठवडय़ात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी निधी वाटपाच्या विषयावरून महापालिका आयुक्तांना घेराव घातला. त्यानंतर माजी नगरसेवकांना महापालिकेत जमावाने येण्यास बंदी घालण्यात आली.
बृहन्मुंबई महापालिकेतर्फे दोन उद्यानांचे सुशोभिकरण
तसे आदेशही सुरक्षारक्षकांना देण्यात आले. मात्र सावधगिरीचा उपाय म्हणून आता पक्ष कार्यालयाबाहेरील सर्व आसने हटविण्यात आली. महापालिका मुख्यालयातील शिवसेना पक्ष कार्यालय कोणाचे यावरून शिंदे गट व ठाकरे गटात झालेल्या वादविवादानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने शिवसेनेसह भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष या सर्वच पक्षांची कार्यालये बंद केली होती.
होळी, धुलीवंदनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभेच्छा
ही पक्ष कार्यालये पुन्हा सुरू करावी अशी मागणी सर्वच राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली होती. मात्र आयुक्तांनी कार्यालये उघडण्यास परवानगी दिली नाही.