धर्म संस्कृती

श्री मलंग जागरण धर्म सभेत हाजीमलंग मुक्तीचा निर्धार

श्री क्षेत्र मलंग स्थानाच्या इस्लामीकरण विरोधात जाहीर सभा
कल्याण, दि. ७
हिंदू समाजाच्या वतीने रविवारी श्री मलंगगडाच्या पायथ्याशी नेवाळी गावात श्री क्षेत्र मलंग स्थानाच्या इस्लामीकरण विरोधात
श्री मलंग जागरण धर्म सभेचे आयोजन करण्यात आले होते.‌ सभेत हाजीमलंग मुक्तीचा निर्धार करण्यात आला. या सभेस हजारो हिंदुत्ववादी, हिंदुत्वप्रेमी आणि भाविक उपस्थित होते.

होळी, धुलीवंदनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभेच्छा

विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त सचिव दादा वेदक, नाणिज रत्नागिरीचे नरेंद्र महाराज, पालघरचे स्वामी भरतानंद महाराज, जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराजांचे ११वे वंशज ह.भ.प. अनिकेत महाराज मोरे,श्रीराम युवा सेना अध्यक्ष राजासिंह ठाकूर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

शहर आणि पूर्व उपनगरातील काही भागात ९ ते ११ मार्च दरम्यान दहा टक्के पाणी कपात

‘बुवा मलंग’ हा उल्लेख पेशव्यांच्या काळात, इंग्रजांच्या १९३० मधील रस्त्याच्या निविदा नोटीसीत आहे. या स्थानावरील पुजारी
ब्राह्मण असून या स्थानाचा आणि हाजीचा काही संबंध नाही,
असे ह.भ.प. वारींगे महाराज यांनी सांगितले. ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख दिवंगत आनंद दिघे यांचा आणि या त्यांच्या हाजीमलंग मुक्ती आंदोलनाचा विशेषत्वाने उल्लेख केला.

‘उबाठा’ गटाच्या ‘शिवसंवाद’ ला आशीर्वाद यात्रेचे प्रत्युत्तर

राजासिंह ठाकूर यांनी खोटा इतिहास सांगणाऱ्यांचा तीव्र निषेध करून, मलंग मुक्तीसाठी निर्धार व्यक्त केला. हिंदूंनो जे काही खरेदी कराल ते हिंदू बांधवांकडूनच खरेदी करा, असे आवाहन केल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माघ पौर्णिमेला श्री मलंग गडावर येऊन आरती केल्याबद्दल अभिनंदन केले आणि हा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आदर्श घ्यावा, असेही ठाकूर यांनी सुचविले.

मेट्रोच्या एक्सर आणि आकुर्ली स्थानकाच्या व्यवस्थापनासह सर्व कारभार महिलांवर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध गड, किल्ल्यांवर झालेली धार्मिक आक्रमणे हा ‘लँड जिहाद’ आहे असे भरतानंद महाराज यांनी सांगितले. तर समस्त हिंदूंनी एक होवून आपली मतपेढी तयार करावी, असे नरेंद्र महाराज म्हणाले. लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर्श घ्यावा असे दादा वेदक यांनी सांगितले.

मुंबई ते गोवा वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात येईल- रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील

या प्रकरणी वफ्फ बोर्डाची ढवळाढवळ नको, श्रीमलंग गड तीर्थक्षेत्र घोषित करावे, विश्वस्तांच्या नेमणूका कराव्या, समाधीवर हिंदू रितीरिवाजानुसार पूजाअर्चा व्हावी असे ठराव या धर्म सभेत मंजूर करण्यात आले. हे ठराव ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहेत. सभेच्या सुरुवातीला श्रीमलंग स्थानाची माहिती देणारी दिनेश देशमुख यांच्या आवाजातील ध्वनीचित्रफित सादर करण्यात आली.

‘म्हाडा’ मुंबई मंडळातर्फे बांधण्यात येणा-या वस्तीगृहाच्या कामाला अखेर सुरूवात
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *