वरळी येथील मैदान महापालिका विकसित वकरणार
मुंबई दि.०५ :- वरळी येथील आदर्श नगर स्पोर्ट्स क्लब मैदानाचा बृहन्मुंबई महानगरपालिकतर्फे विकास करण्यात येणार आहे. हे मैदान सध्या ‘म्हाडा’ प्राधिकरणाच्या अखत्यारीतील आहे. वरळी कोळीवाड्याला लागून असलेल्या या मैदानात सध्या कोणत्याच सोयी सुविधा नाहीत.
‘उबाठा’ गटाच्या ‘शिवसंवाद’ ला आशीर्वाद यात्रेचे प्रत्युत्तर
मैदानातील पदपथ सुधारणे, जमिनीचा दर्जा सुधारणे, पावसाळ्यात मैदानात पाणी साचू नये म्हणून मैदानाखाली पर्जन्यजल वाहिन्या टाकणे अशी कामे केली जाणार आहेत.
मुंबई ते गोवा वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात येईल- रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील
मैदानात व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी खेळांसाठीच्याही सुविधा खुली व्यायामशाळा, विद्युत रोषणाई, मैदानाच्या परिघाभोवती जाळ्या बसविणे ही कामेही केली जाणार आहेत. यासाठी महापालिका १ कोटी १८ लाख रुपये खर्च करणार आहे.