शहर आणि पूर्व उपनगरातील काही भागात ९ ते ११ मार्च दरम्यान दहा टक्के पाणी कपात
मुंबई दि.०५ :- जलवाहिनीच्या तातडीच्या दुरुस्ती कामामुळे येत्या ९ मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून शनिवार ११ मार्च रोजी सकाळी १०वाजेपर्यंत मुंबई शहर विभाग आणि पूर्व उपनगरांमधील काही परिसरात दहा टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.
वरळी येथील मैदान महापालिका विकसित वकरणार
ठाणे महापलिकेतर्फे कोपरी पुलाजवळ नवीन पुलाचे काम सुरू असताना बृहन्मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीस हानी पोहोचल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत आहे.
‘उबाठा’ गटाच्या ‘शिवसंवाद’ ला आशीर्वाद यात्रेचे प्रत्युत्तर
या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम ९ ते ११ मार्च या कालावधीत केले जाणार आहे. परिणामी ही दहा टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच या कालावधीत पाणी जपून वापरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.