मुंबई ते गोवा वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात येईल- रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील
मुंबई दि.०४ :- मुंबई- गोवा रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाची कामे पूर्ण झाली असून, या मार्गाच्या पाहणी दौऱ्यानंतर मुंबई ते गोवा वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांनी दिले.
मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक
कोकणासह ठाणे जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांसंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांची मुंबईत भाजपाच्या आमदारांनी भेट घेतली. आमदार प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे, गणपत गायकवाड, प्रसाद लाड यांचा या आमदारांत समावेश होता.
संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी दोन जण ताब्यात
कोकणातील प्रवाशांचा प्रवास वेगाने होण्यासाठी शिर्डी व सोलापूरप्रमाणेच गोव्यापर्यंत ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू करावी, अशी आग्रही मागणी आमदारांनी दानवे यांच्याकडे केली. तेव्हा रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून या मार्गाची पाहणी करण्यात येईल. त्यानंतर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचे आश्वासन राज्यमंत्री दानवे यांनी दिले.