मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक
मुंबई दि.०४ :- मध्य आणि हार्बर या रेल्वे मार्गांवर उद्या (रविवारी) सकाळी देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन पाचव्या, सहाव्या मार्गिकेवर सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे पुणे- मुंबई प्रगती एक्स्प्रेस कर्जत-कल्याण मार्गे वळविण्यात येणार आहे.
संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी दोन जण ताब्यात
तसेच सर्व अप आणि डाऊन मार्गावर मेल एक्स्प्रेस कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर वळविण्यात येणार आहेत. वसई रोड येथून सकाळी ९.५० वाजता दिव्यासाठी सुटणारी मेमू कोपर येथे अंशत: रद्द करण्यात येणार आहे तर दिवा येथून सकाळी ११.३० वाजता वसई रोडला जाणारी मेमू दिव्याऐवजी कोपर येथून सकाळी ११.४५ वाजता चालवण्यात येणार आहे. हार्बर रेल्वेवर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
शिवाजी उद्यान येथे ‘जाणता राजा’ महानाट्याचे आयोजन
परिणामी ब्लॉक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेल / बेलापूर / वाशीला जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा तसेच वाशी / बेलापूर / पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप – डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.