ठळक बातम्या

पुढील चार दिवस राज्यातील काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची शक्यता

मुंबई दि.०४ :- आजपासून येत्या ८ मार्चपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची शक्यता वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात ६ मार्च पर्यंत अंशत: ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडतील, अशी शक्यता आहे.

मेट्रोच्या एक्सर आणि आकुर्ली स्थानकाच्या व्यवस्थापनासह सर्व कारभार महिलांवर

पूर्वेकडून येणारे वारे, उत्तर-दक्षिण ढगांची द्रोणीय स्थिती आणि अरबी समुद्रात नैऋत्येकडून वायव्य भारताच्या दिशेने सरकणारे पण उत्तर महाराष्ट्राकडे वळणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांचा मिलाफ यामुळे अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

गड-दुर्ग रक्षण आणि संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणार – पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज आणि रविवारी धुळे, नंदुरबार, जळगाव नाशिक जिल्ह्यात हलक्या सरींसह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर, रविवार आणि सोमवार या दिवशी औरंगाबाद , जालना येथे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *