मेट्रोच्या एक्सर आणि आकुर्ली स्थानकाच्या व्यवस्थापनासह सर्व कारभार महिलांवर
मुंबई दि.०४ :- दहिसर -गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेतील एक्सर आणि दहिसर -अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ मधील आकुर्ली स्थानकाच्या व्यवस्थापनासह स्थानकावरील कारभार चालविण्याची संपूर्ण जाबाबदारी महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
गड-दुर्ग रक्षण आणि संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणार – पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा
७६ महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांवर या दोन्ही मेट्रो स्थानकांची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दिली आहे. मेट्रो प्रकल्पामधील राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा ‘एमएमआरडीए’ने केला आहे. स्थानक व्यवस्थापक, सुरक्षा रक्षक, तिकीट विक्री अधिकारी, पर्यवेक्षक म्हणून महिला या स्थानकांवर कार्यरत असणार आहेत.