शिवाजी उद्यान येथे ‘जाणता राजा’ महानाट्याचे आयोजन
मुंबई दि.०४ :- महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या सहा प्रयोगांची मालिका १४ मार्च ते १९ मार्च या कालावधीत शिवाजी उद्यान, दादर येथे आयोजित करण्यात आली आहे. दररोज संध्याकाळी पावणे सात वाजता महानाट्याचे प्रयोग होणार आहेत.
पुढील चार दिवस राज्यातील काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची शक्यता
भाजपचे आमदार ॲड. आशिष शेलार यांनी याचे आयोजन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि जीवनचरित्र सांगणा-या या महानाट्यात अडीचशेहून अधिक कलाकारांचा सहभाग आहे. या महानाट्यात शिवजन्म पूर्व काळ, शिवजन्म, शिवरायांचा न्याय निवाडा, रांझ्याच्या पाटलाला दिलेली शिक्षा, अफझलखान वध, सुरतेचा छापा, शाहिस्तेखानाची फजिती, आग्र्याहून सुटका आणि राज्यभिषेक सोहळा अशा अनेक प्रसंगांचे सादरीकरण केले जाणार आहे.
मेट्रोच्या एक्सर आणि आकुर्ली स्थानकाच्या व्यवस्थापनासह सर्व कारभार महिलांवर
महानाट्याच्या विनामूल्य प्रवेशिका शिवाजी मंदिर- दादर, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह- बोरिवली, दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह-विलेपार्ले, कालिदास नाट्यगृह- मुलुंड, दामोदर नाट्यगृह- परेल येथे येत्या ९ मार्चपासून मिळू शकतील.