मुंबई विमानतळ ते ठाणे कॅडबरी जंक्शन ‘बेस्ट’ बस सुरू
मुंबई दि.०३ :- भ्रमणध्वनी ॲपआधारित आसन आरक्षित करणारी मुंबई विमानतळ ते ठाणे कॅडबरी जंक्शन ‘बेस्ट’ची प्रिमियम बससेवा आजपासून सुरू झाली. ठाणे कॅडबरी जंक्शन ते मुंबई विमानतळ सेवेचे भाडे २०० रुपये असणार आहे.
माता रमाबाई आंबेडकर चौक/मरोळ नाका, डॉ. दत्ता सामंत चौक, चांदिवली जंक्शन, तुंगा व्हिलेज, डॉ. आंबेडकर उद्यान पवई, पंचकुटीर, आयआयटी मार्केट, टागोरनगर, जंक्शन, कांजूरमार्ग व्हिलेज, भांडुप व्हिलेज, भांडुप पम्पिंग सेंटर, मिठागर, मॅरेथॉन चौक तीन हात नाका, लुईसवाडी, कॅडबरी जंक्शन ठाणे, असा बसचा मार्ग असणार आहे.