यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकपणा, नम्रता आणि सातत्यता हे गुण आवश्यक – ‘पद्मश्री’ पुरस्कारसन्मानित गजानन माने यांचे प्रतिपादन
डोंबिवली दि.०३ :- एखाद्या कार्यात यशस्वी व्हायचे असेल तर प्रामाणिकपणा, नम्रता आणि सातत्यता हे गुण अंगी असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन
‘पद्मश्री’ पुरस्कार सन्मानित डोंबिवलीकर गजानन माने यांनी काल येथे केले. येथील आगरी समाज मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विद्यार्थी संमेलनात माने विशेष अतिथी म्हणून बोलत होते. राष्ट्रीय महिला आयोग सल्लागार समितीच्या सदस्या ॲड. वृंदा कुलकर्णी या ही विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
ठाणे परिसरातील महामार्ग, जोड रस्ते, पुल दुरूस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा- मुख्यमंत्री शिंदे
कोकण प्रदेशमंत्री अमित ढोमसे, प्रा. भूषण ठाकरे, डॉ. निलेश जाधव, जिल्हा संयोजक स्नेहा शिर्के, जिल्हा संमेलन प्रमुख प्रथम माधवपूरकर यावेळी उपस्थित होते. संमेलनात ॲड. वृंदा कुलकर्णी, प्रा. भूषण ठाकरे, डॉ. निलेश जाधव यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डोंबिवली शहर मंत्री श्रावणी मोहरील यांनी उपस्थितांचे आभार मानले. संमेलनाची सुरुवात शोभायात्रेने तर सांगता संपूर्ण वंदे मातरम् ने झाली. या जिल्हास्तरीय संमेलनास विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राध्यापक, कार्यकर्ते असे तीनशे जण उपस्थित होते.