‘मनसे’ नेते संदीप देशपांडे यांना अज्ञात हल्लेखोरांकडून मारहाण
मुंबई दि.०३ :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते/प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी शिवाजी उद्यानाजवळ काही अज्ञात व्यक्तिंनी मारहाण केली. जखमी झालेल्या देशपांडे यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले.
मुंबई विमानतळ ते ठाणे कॅडबरी जंक्शन ‘बेस्ट’ बस सुरू
देशपांडे आज सकाळी नेहमीप्रमाणे प्रभात फेरीसाठी शिवाजी उद्यान परिसरात गेले होते. एका टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. स्टम्पच्या सहाय्याने त्यांना मारहाण करण्यात आली. यात देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली. देशपांडे यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अमित ठाकरेही यांनी देशपांडे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि प्रकृतीची चौकशी केली. या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना देशपांडे म्हणाले, आम्ही कोणालाही घाबरत नाही, घाबरणार नाही. अशा प्रकारे घाबरविण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. दरम्यान या हल्ल्याप्रकरणी संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंची चौकशी करावी, अशी मागणी मनसेचे अमेय खोपकर यांनी केली आहे.