टिटवाळा लोकलच्या मालडब्यात बेदम मारहाणीत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
कल्याण दि.०३ :- कल्याण ते टिटवाळा रेल्वे स्थानक दरम्यान लोकलमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला माल वाहतूक डब्यात बेदम मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बबन हांडे – देशमुख (६५) असे मृत प्रवाशाचे नाव आहे.
‘मनसे’ नेते संदीप देशपांडे यांना अज्ञात हल्लेखोरांकडून मारहाण
आंबिवली येथे हांडे- देशमुख गुरुवारी दुपारी काही कामानिमित्त कल्याण येथे आले होते. काम आटोपल्यानंतर ते कल्याण रेल्वे स्थानकातून टिटवाळा लोकलने घरी चालले होते. सामान्य डब्यात गर्दी असल्याने ते लोकलमधील मालवाहतूक डब्यात चढले.
मुंबई विमानतळ ते ठाणे कॅडबरी जंक्शन ‘बेस्ट’ बस सुरू
लोकलमध्ये चढत असताना त्यांचा धक्का एका प्रवाशाला लागला. तेव्हा बबन यांनी दिलगिरीही व्यक्त केली. मात्र या प्रवाशाने बबन यांना बेदम मारहाण केली आणि या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.