वाहतूक दळणवळण

विरार -अलिबाग बहुउद्देशीय महामार्गिका प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला पुढच्या वर्षी सुरुवात

मुंबई दि.०२ :- गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या विरार -अलिबाग बहुउद्देशीय महामार्गिका प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला पुढच्या वर्षी सुरुवात करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे.

कसबा पोटनिवडणूक निकाल भाजपने आत्मपरीक्षण करावे आणि कॉंग्रेसने हुरळू नये

भूसंपादनाच्या कामाला वेग देण्यात आला असून, भूसंपादन मेपर्यंत पूर्ण करण्याचे ‘एमएसआरडीसी’चे नियोजन आहे. येत्या मे महिन्यानंतर मार्गिकेच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) होता.

‘म्हाडा’ मुंबई मंडळातर्फे बांधण्यात येणा-या वस्तीगृहाच्या कामाला अखेर सुरूवात

मात्र ‘एमएमआरडीए’ला प्रकल्प मार्गी लावण्यात यश येत नसल्याने शेवटी राज्य सरकारने हा प्रकल्प ‘एमएसआरडीसी’कडे सोपविला. १२८ किलोमीटर लांबीच्या आणि १६ मार्गिका असलेल्या या प्रकल्पासाठी १हजार ३०० हेक्टरहून अधिक जमीन संपादन करावी लागणार आहे. या भूसंपादनासाठी २२ हजार कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *