क्रीडा

मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे

मुंबई दि.२० :- महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या पहिल्या हंगामासाठी भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करणार आहे.

‘म्हाडा’ मुंबई मंडळातर्फे बांधण्यात येणा-या वस्तीगृहाच्या कामाला अखेर सुरूवात

हरमनप्रीतने नुकतेच १५० आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामने पूर्ण केले. गेल्या दशकभरात भारतीय संघाने मिळवलेल्या यशात हरमनप्रीतने महत्त्वाचे योगदान दिले.

विरार -अलिबाग बहुउद्देशीय महामार्गिका प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला पुढच्या वर्षी सुरुवात

अर्जुन पुरस्कारप्राप्त हरमनप्रीतच्या नावे महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत एका सामन्यात सर्वाधिक नाबाद १७१ धावांचा विक्रमही आहे.
येत्या ४ मार्च रोजी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणाऱ्या ‘डब्ल्यूपीएल’च्या सलामीच्या लढतीत मुंबईपुढे गुजरात जायंट्सचे आव्हान असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *