‘म्हाडा’ मुंबई मंडळातर्फे बांधण्यात येणा-या वस्तीगृहाच्या कामाला अखेर सुरूवात
मुंबई दि. ०२ :- शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने मुंबईत येणा-यांसाठी जिजामाता नगर येथे वसतीगृह बांधण्याच्या कामाला म्हाडाच्या मुंबई मंडळाने सुरूवात केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे काम रखडले होते.
मुंबईत दोन वसतिगृहे बांधण्याचा निर्णय म्हाडा मुंबई मंडळाने घेतला होता. यापैकी एक वसतिगृह जिजामाता नगर येथील १८२१ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर बांधण्यात येणार आहे. वसतिगृहाच्या बांधकामाला फेब्रुवारी २०२२ मध्ये सुरुवात करण्यात येणार होती. कामाचे कार्यादेशही जारी करण्यात आले. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे काम सुरू झाले नाही. आता या कामाला सुरुवात झाली असून इमारतीच्या पायासाठी खोदकाम सुरू झाले आहे.
कसबा पोटनिवडणूक निकाल भाजपने आत्मपरीक्षण करावे आणि कॉंग्रेसने हुरळू नये
या वसतिगृहासाठी १९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वसतिगृहासाठी १८ मजली इमारत बांधण्यात येणार असून, या इमारतीत ३७५ खोल्या असतील. वसतिगृहात ५०० जणांच्या निवासाची सोय असणार आहे. वसतिगृहात खाणावळ, बँक, व्यायामशाळा, वाहनतळ आदी सोयी-सुविधांचा समावेश असणार आहे.