यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे महापालिकेचे आवाहन
मुंबई दि.०२ :- यंदाच्या वर्षीचा (१९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२३) सार्वजनिक गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिकेचे उपायुक्त तथा गणेशोत्सव समन्वयक रमाकांत बिरादार यांनी आज़ बुधवारी येथे केले. महापालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभाग कार्यालयातील सभागृहात आयोजित एका विशेष बैठकीदरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे
या बैठकीला बृहन्मुंबई पोलीस दलातील उपायुक्त अकबर पठाण, महाराष्ट्र राज्याच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य समन्वयक डॉक्टर सुभाष दळवी, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे नरेश दहिबावकर, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे सुरेश सरनोबत यांच्यासह गणेश मंडळाच्या विविध संघटनांचे व मूर्तिकार संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विरार -अलिबाग बहुउद्देशीय महामार्गिका प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला पुढच्या वर्षी सुरुवात
ही विशेष बैठक केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे लागू करण्यात आलेल्या ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या (पीओपी) मूर्तींवरील बंदीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या सुरुवातीला उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची माहिती उपस्थितांना दिली. त्यावर बैठकीला उपस्थित असणाऱ्या विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी सविस्तर साधक – बाधक चर्चा केली.
‘म्हाडा’ मुंबई मंडळातर्फे बांधण्यात येणा-या वस्तीगृहाच्या कामाला अखेर सुरूवात
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) चे नवनियुक्त ‘राज्य समन्वयक’ डॉक्टर सुभाष दळवी यांची राज्यस्तरावर नेमणूक झाल्याबद्दल उपस्थित विविध संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे त्यांचा सत्कार करण्यात आला. दळवी यांनी सुमारे ३० वर्षांपूर्वी मुंबईत यशस्वीपणे राबविलेली निर्माल्य कलश योजना आज देशभरात राबविली जात असल्याचा आवर्जून व गौरवपूर्ण उल्लेख गणेशोत्सव मंडळाच्या प्रतिनिधींनी बैठकीत केला.