बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यातील अडचणी दूर करण्यासाठी तातडीची बैठक- मुख्यमंत्री शिंदे
मुंबई दि.२८ :- इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका तपासल्या जात नसल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी तातडीने एका बैठकीचे आयोजन केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.
राज्यात बारावीची परीक्षा सुरू असून विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका तपासल्या जात नाहीत; त्या पडून आहेत.
त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. यातील काही विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जाणारे असल्याने त्यांच्या उत्तरपत्रिका वेळेत तपासल्या गेल्या नाहीत तर निकालाला विलंब होईल. त्यामुळे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी विनंती भाजप आमदार, ॲड. आशिष शेलार यांनी केली होती.
काँग्रेसप्रमाणे भाजपकडूनही मुस्लिमांचे लांगुलचालन सुरु- अधिवक्ता सतीश देशपांडे
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी हा विषय गंभीर असून सरकारने तातडीने दखल घ्यावी, असे आदेश दिले. यावेळी शिक्षणमंत्री सभागृहात उपस्थितीत नव्हते, त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी या विषयावर तातडीने बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असे सांगितले.