समृद्ध इतिहास असणाऱ्या मराठी भाषेचे संवर्धन करणे आपले कर्तव्य – डॉ सदानंद मोरे
महापालिका नाट्यगृहे परिसरात पुस्तक विक्रीला सुरवात
मुंबई दि.२८ :- आपली मराठी भाषा समृद्ध असून या भाषेला दोन हजार वर्षांचा इतिहास लाभला आहे. मराठी भाषेचे जतन, संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी सोमवारी येथे केले. बृहन्मुंबई महापालिकेने महापालिका मुख्यालयात आयोजित केलेल्या मराठी भाषा पंधरवडा कार्यक्रमात ते बोलत होते.
बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यातील अडचणी दूर करण्यासाठी तातडीची बैठक- मुख्यमंत्री शिंदे
सातवाहनकालीन प्रशासकीय मराठी ते आजच्या २१ व्या शतकात वापरात येणाऱ्या मराठी भाषेचा विकास या विषयावर विविध उदाहरणांसहित इतिहासातील अनेक दाखले, संदर्भ याचे विवेचन त्यांनी केले. सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांनी प्रास्ताविक केले.
या कार्यक्रमात दुरदृश्य प्रणालीद्वारे विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथील पुस्तक विक्री दालनाचा शुभारंभ अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा यांच्या तर बोरिवली(पश्चिम) परिसरातील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथील पुस्तक विक्री दालनाचा शुभारंभ डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.