पाच सदस्यांनाही सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करता येणार
मुंबई दि.२६ :- पाच सदस्यांनाही आता सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करता येणार आहे. सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यासाठी किमान दहा सदस्य असावेत, ही पूर्वीची अट आता रद्द होणार आहे.
मराठी भाषा दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन
सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यासाठी आता फक्त पाच सदस्य अर्ज करू शकतील. अशी परवानगी देणारी नियमावली येत्या मार्च महिन्याच्या अखेपर्यंत राज्य शासनाच्या सहकार विभागामार्फत जारी केली जाणार आहे.
बृहन्मुंबई महापालिका ‘एसबीआय’ अर्ध मॅरेथॉन प्रोमोरनला मुंबईकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्था कायद्यात सुधारणा करणारे विधेयक महाविकास आघाडी सरकारच्या काळात ९ मार्च २०१९ रोजी मंजूर करण्यात आले, परंतु आतापर्यंत नियमावली जारी करण्यात आली नव्हती. आता चार वर्षांनंतर नियमावली जारी करण्यात येणार आहे.