मराठी भाषा दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन
मुंबई दि.२६ :- मराठी भाषा दिनानिमित्त उद्या ( २७ फेब्रुवारी) मुंबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार आणि कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो.
बृहन्मुंबई महापालिका ‘एसबीआय’ अर्ध मॅरेथॉन प्रोमोरनला मुंबईकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बृहन्मुंबई महापालिकेची नाट्यगृहे आणि तरण तलावांच्या ठिकाणी पुस्तकांची विक्री करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभही उद्या होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, दादर, यमुनाताई हिर्लेकर चौक, माटुंगा येथे पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी खुले आहे.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून (२७ फेब्रुवारी) सुरू
विलेपार्ले कल्चरल सेंटरतर्फे २७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात ‘हृदय सोहळा’ या अंतर्गत अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम आणि सहकारी ‘मधुरव’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पणदिनानिमित्त उद्या ‘शोध हा नवा -शतजन्म शोधिताना’ कार्यक्रम
भारतीय जनता पक्ष मुंबई तर्फे संध्याकाळी पाच वाजता मुलंड (पूर्व ) येथील मराठा मंडळ सभागृहात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येणार असून ‘स्वरतरंग’ हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे रमेश शिर्के, कृष्णाजी कोर्टी, सुकृत खांडेकर, डॉ. कुशल सावंत, डॉ. रोहन प्रधान, कुमार सोहोनी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. भाजपा मुंबई अध्यक्ष ॲड. आशिष शेलार, खासदार मनोज कोटक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.