धारावीतील कमला नगर झोपडपट्टीला लागलेल्या आगीत साठ झोपड्या जळून खाक
मुंबई दि.२२ :- धारावीमध्ये शाहूनगर परिसरात कमला नगर झोपडपट्टीत बुधवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत साठ झोपड्या जळून खाक झाल्या.
ज्येष्ठ अर्थतज्ञ चन्द्रशेखर टिळक यांची तीन दिवसांची व्याख्यानमाला
अत्यंत अरुंद गल्ल्या, दाटीवाटीने असलेल्या झोपड्या, आणि ज्वलनशील वस्तू यामुळे ही आग सर्वदूर पसरली आणि काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले.
सोन्याच्या तस्करीविरोधातील मोहिमेत १०१ किलो सोने जप्त, १० जणांना अटक
या दोन/ तीन मजली झोपड्यांमध्ये कापड शिलाई, बॅग बनविणे असे व्यवसाय चालत असल्याने संबंधित सामान या झोपड्यांमध्ये, गोदामात होते. त्याला देखील आग लागली. अग्निशमन दलाच्या २० ते २५ गाड्यांवरील अग्निशमन कर्मचाऱ्यांनी पाच तासांनंतर आग आटोक्यात आणली.