ज्येष्ठ अर्थतज्ञ चन्द्रशेखर टिळक यांची तीन दिवसांची व्याख्यानमाला
मुंबई दि.२२ :- डोंबिवली ( पूर्व ) येथील श्री गुरुदत्त सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, लेखक चंद्रशेखर टिळक यांच्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
सोन्याच्या तस्करीविरोधातील मोहिमेत १०१ किलो सोने जप्त, १० जणांना अटक
शनिवार ,२५ फेब्रुवारी रोजी ‘अर्थकारण’ रविवार , २६ फेब्रुवारीला ‘वेगळी वेडी भटकंती’ तर सोमवार ,२७ फेब्रुवारी रोजी ‘श्री गजानन विजय : एक ललित कलाकृती’ या विषयांवर टिळक बोलणार आहेत.
मत्स्य व्यवसायाला चालना देणारे उद्योग महाराष्ट्रात आणणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ही व्याख्याने सर्वांसाठी खुली असून दररोज संध्याकाळी ६ वाजता शास्त्री हॉल , विठ्ठल मंदिर पथ , दत्तनगर ,डोंबिवली( पूर्व) येथे ही व्याख्याने होणार आहेत.