बृहन्मुंबई महापालिकेतर्फे अर्ध मॅरेथॉन स्पर्धेच्या तयारीसाठी येत्या २६ फेब्रुवारीला ‘प्रोमो-रन’
मुंबई, दि. २१
बृहन्मुंबई महापालिकेतर्फे येत्या २६ फेब्रुवारी रोजी अर्ध मॅरेथॉन स्पर्धेच्या तयारीसाठी ‘प्रोमो-रन’चे आयोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फिट इंडिया’ अभियानाची सुरुवात केली असून त्याचा एक भाग म्हणून महापालिकेने ‘फिट मुंबई बीएमसी एसबीआय हाफ मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे.
मंत्रालयातील शिवसेना कार्यालय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांकडून ताब्यात
याच्या तयारीसाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी व अतिरिक्त पोलिस आयुक्त (वाहतूक) निसार तांबोळी, अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर, प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि मॅरेथॉन प्रोमो-रनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मध्य रेल्वेवर अप आणि डाऊन जलद मार्गाच्या लोकल थांब्यात बदल
महापालिकेतर्फे आयोजित करण्यात येणारी ही अर्ध मॅरेथॉन स्पर्धा भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकीक असलेली मॅरेथॉन ठरेल, असा विश्वास महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अंध युवा चमूची शिवनेरी किल्ल्याला भेट
‘फिट मुंबई बीएमसी एसबीआय हाफ मॅरेथॉन’ चे समन्वयक तथा सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी ‘प्रोमो-रन’ च्या नियोजनबाबत सादरीकरण केले.
दोन्ही काँग्रेसशी करता संग, शिवसेनेचा झाला अंत
या ‘प्रोमो-रन’मध्ये पाच हजार नागरिक सहभागी होणार असून याबाबतची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. याची सुरुवात सकाळी सहा वाजता बृहन्मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाजवळ होणार आहे.
——-