मंत्रालयातील शिवसेना कार्यालय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांकडून ताब्यात
महापालिकेतील पक्ष कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न
मुंबई दि.२० :- शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट) मिळाल्यानंतर मंत्रालयातील शिवसेनेचे पक्ष कार्यालय शिंदे समर्थक आमदारांनी ताब्यात घेतले. आता बृहन्मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि बाळासाहेबांची शिवसेना हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे ठाण्यात नवा उड्डाणपूल
मुख्यमंत्री शिंदे समर्थकांकडून बृहन्मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालय ताब्यात घेण्याची कुणकुण लागल्यामुळे उद्धव ठाकरे समर्थक माजी नगरसेवकांनी सोमवारी महानगरपालिका मुख्यालयात धाव घेतली.
मध्य रेल्वेवर अप आणि डाऊन जलद मार्गाच्या लोकल थांब्यात बदल
महापालिका मुख्यालयातील कुलूपबंद केलेले पक्ष कार्यालय उघडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक ताब्यात घेतील अशी जोरदार चर्चा सुरू होती. त्यामुळे माजी सभागृह नेत्या आणि उद्धव ठाकरे समर्थक विशाखा राऊत आणि अन्य माजी नगरसेवकांनी महानगरपालिका मुख्यालयात धाव घेतली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महापालिका मुख्यालयात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.