राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षेला आजपासून सुरुवात
मुंबई दि.२१ :-महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षेला (इयत्ता १२ वी) आजपासून ( मंगळवार) सुरुवात होणार आहे. ही परीक्षा येत्या २१ मार्चपर्यंत चालणार असून यंदाच्या वर्षी १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
बृहन्मुंबई महापालिकेतर्फे अर्ध मॅरेथॉन स्पर्धेच्या तयारीसाठी येत्या २६ फेब्रुवारीला ‘प्रोमो-रन’
बारावीच्या लेखी परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात ३ हजार १९५ मुख्य केंद्रे असून यंदाच्या परीक्षेदरम्यान कॉपी मुक्त अभियान राबविण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटांच्या नेत्यांचे ‘ट्विटर’वर ‘धनुष्यबाण’ हे प्रोफाईल पिक्चर
कॉपी रोखण्यासाठी प्रत्येक केंद्रांवर विशेष भरारी पथके आणि बैठी पथके तैनात केली जाणार आहेत. विद्यार्थ्यांना वेळेच्या दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याच्या पद्धतीत यंदापासून बदल करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षापासून दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका न देता उत्तरपत्रिका लिहिताना शेवटी दहा मिनिटे वाढवून दिली जाणार आहेत.