साहित्य- सांस्कृतिक

नागरी अभिवादन सोहळ्यात विविध सन्मान पुरस्कार प्रदान

डोंबिवली दि.२० :- डोंबिवलीतील ४७ संस्थांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या नागरी अभिवादन न्यास’ या शिखर संस्थेतर्फे यंदाचा नागरी अभिवादन सोहळा टिळकनगर शाळेच्या पटांगणात पार पडला. ‘पद्मश्री’ पुरस्कारप्राप्त रमेश पतंगे प्रमुख पाहुणे तर श्री गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्षा अलका मुतालिक या अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अंध युवा चमूची शिवनेरी किल्ल्याला भेट

न्यासाचे पदाधिकारी सुधीर जोगळेकर,माधव जोशी,प्रवीण दुधे,जयंत फलके हे ही व्यासपीठावर उपस्थित होते. या सोहळ्यात ‘ज्येष्ठ नागरी सन्मान’ डॉ. अंजली आपटे ( अपंग सेवा ), श्रीकांत पावगी ( शैक्षणिक आणि पत्रकारिता), सुरेश फाटक ( वनवासी सेवा ), सुभाष मुंदडा ( ग्रंथालय संचालन ) यांना प्रदान करण्यात आला. राही पाखले ( क्रिडा क्षेत्रात भरीव कामगिरी) ,अमोल पोतदार‌ ( शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील शैक्षणिक क्षेत्रात योगदान ),रुपाली शाईवाले ( डोंबिवलीच्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण दक्षता मंचामार्फत अमूल्य योगदान ) यांना ‘युवाचैतन्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दोन्ही काँग्रेसशी करता संग, शिवसेनेचा झाला अंत

विवेकानंद सेवा मंडळाला संस्था पुरस्कार ( विहिगाव परिसरातील व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कार्यासाठी) देण्यात आला. कुष्ठरोगी वसाहतीत काम करणाऱ्या गजानन माने यांचा ‘पद्मश्री’ सन्मान मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. चित्रकार प्रभू कापसे यांनी तयार केलेली देखणी सन्मान चिन्हे देऊन सर्वांना गौरविण्यात आले. कौस्तुभ कुलकर्णी यांनी ध्वनी चित्रफीतीद्वारे सत्कारमूर्तींचा जीवनपट उलगडला.
प्रारंभी ओंकार शाळेच्या लेझिम पथकासह शिवप्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिद्धी करकरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *