छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अंध युवा चमूची शिवनेरी किल्ल्याला भेट
डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शहर शाखेतर्फे आयोजन
डोंबिवली दि.१९ :- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ५० अंध युवा चमूने शिवनेरी किल्ल्याला भेट दिली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शहर शाखेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात राज्याच्या विविध भागांतील १८ ते ३० या वयोगटातील युवक, युवती सहभागी झाले होते.
दोन्ही काँग्रेसशी करता संग, शिवसेनेचा झाला अंत
शनिवारी रात्री रात्री बारा वाजता डोंबिवली शहर शाखेशेजारी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अंध चमूच्या वतीने शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि पन्नास जणांचा चमू शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी रवाना झाला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटांच्या नेत्यांचे ‘ट्विटर’वर ‘धनुष्यबाण’ हे प्रोफाईल पिक्चर
शहर सचिव संतोष चव्हाण, उपशहर प्रमुख गजानन व्यापारी, विभाग प्रमुख समीर कवडे, शाखाप्रमुख वैभव राणे, धनाजी चौधरी, महिला सेनेच्या केतकी पोवार, उषा आचरेकर, शिवसैनिक रोहित जमादार, शैलेश चव्हाण, ज्येष्ठ शिवसैनिक श्रीकांत उपाध्ये, उपकार्यालय प्रमुख सागर बापट, कार्यालय प्रमुख प्रकाश माने, शहर समन्वयक जीतेन पाटील आदि पदाधिकारी, शिवसैनिक, शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.