‘महारेरा’च्या नोटीसीनंतर विकासकाकडून नोंदणीकृत प्रकल्पाची माहिती अद्ययावत
मुंबई दि.२० :- रेरा कायद्यानुसार दर तीन महिन्यांनी नोंदणीकृत प्रकल्पाची माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे. ही माहिती अद्ययावत न करणाऱ्या प्रकल्पांना ‘महारेरा’ने नोटिसा बजाविल्यानंतर विकासकांकडून माहिती अद्ययावत करण्यात आली. या माहितीनुसार ७०० प्रकल्प पूर्ण झाले असून ७०५ प्रकल्पाच्या नूतनीकरणाचे अर्ज सादर झाले आहेत.
नागरी अभिवादन सोहळ्यात विविध सन्मान पुरस्कार प्रदान
रेरा कायद्यानुसार नवीन प्रकल्पांना महारेरा नोंदणीसह अटी आणि तरतुदीचे पालन करणेही तसेच दर तीन महिन्यांनी प्रकल्पाची माहिती अद्ययावत करून ती संकेतस्थळावर टाकणेही बंधनकारक आहे. मात्र, या नियमाचे विकासकांकडून उल्लंघन करण्यात येते.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अंध युवा चमूची शिवनेरी किल्ल्याला भेट
त्यामुळे अशा प्रकल्पाविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेत ‘महारेरा’ने घेतला आणि डिसेंबर २०२२ मध्ये १९ हजार ५३९ प्रकल्पांना माहिती अद्ययावत करा, अन्यथा कारवाई करू, असा इशारा दिला होता. प्रकल्प नूतनीकरणासाठीही विकासक पुढे आले आहेत. आतापर्यंत दर महिन्याला सुमारे १२० अर्ज नूतनीकरणासाठी येत होते. कारवाईच्या इशाऱ्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये ७०५ अर्ज दाखल झाले आहेत.