मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक
मुंबई दि.१८ :- मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या ( रविवार) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर विद्याविहार ते ठाणे दरम्यान ५ व्या आणि ६ व्या मार्गिकेवर सकाळी ११.०० ते दुपारी ३.३० पर्यंत मेगाब्लॉक आहे. या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि विद्याविहार दरम्यान जलद मार्गावरून वळविण्यात येणार आहेत.
नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबईत आगमन
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे हार्बर रेल्वे मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हार्बर रेल्वे मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगावसाठी सुटणा-या हार्बर मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री शिंदे गटाला – निवडणूक आयोगाचा निर्णय
तसेच पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक रद्द करण्यात आली आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालविल्या जाणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मध्य रेल्वे मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.