ठळक बातम्या

‘आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रमात ३६१ मुंबईकर नागरिकांना प्रशिक्षण

मुंबई दि.१८ :- बृहन्मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे सुरू करण्यात आलेल्या ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रमास मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.‌ परळ येथील शहर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्रात १२ दिवसांचा हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून आतापर्यंत ३६१ स्वयंसेवकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. प्रशिक्षणात भाग घेतलेल्‍या ३६१ स्‍वयंसवेकांमध्‍ये एनएसएस, एनसीसी, नागरी संरक्षण दल, गृहरक्षक दल, विविध खाजगी कंपन्‍यांचे कर्मचारी, रुग्‍णालयांमध्‍ये काम करणारे अधिकारी / कर्मचारी, नागरिक यांचा सहभाग होता.

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक

प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केलेल्या स्‍वयंसेवकांपैकी काही स्‍वयंसेवकांनी त्‍यांना दिलेल्‍या प्रशिक्षणाचा लाभ घेत अपघातात जखमी झालेल्‍या नागरिकांना मदत केली. ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात येत्या ३१ मार्च पर्यंत एक हजार व्यक्तिंना प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान प्रशिक्षणार्थींना प्रथमोपचार, हृदयविकाराच्या अनुषंगाने सीपीआर, जखमींवर करावयाच्या उपचार पद्धती व बँडेज बांधणे, शोध व बचाव कार्य करणे, उंच इमारतींवर दोरांच्या सहाय्याने बचाव करणे, आग विझविणे, भूकंप – वादळ – पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तींच्या वेळी बचाव करणे याबाबतचे प्रशिक्षण तज्ज्ञ प्रशिक्षकांद्वारे प्रात्यक्षिकांसह देण्यात येते.‌

नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबईत आगमन

यापुढील आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम येत्या २०, २७ फेब्रुवारी, ०६ १३ आणि २० मार्च २०२३ या तारखांना आयोजित करण्‍यात आला आहे. १८ ते ४० या वयोगटातील इच्‍छुक मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शहर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र, साईबाबा पथ, फीनले मिल समोर, मोनो रेल्‍वे पिलर क्रमांक ४३ च्या समोर, परळ, मुंबई – ४०० ०१२. संपर्क क्रमांक १९१६ येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *