संसर्गजन्य आजारांवर संशोधन करण्यासाठी महापालिकेतर्फे प्रयोगशाळेची उभारणी
मुंबई दि.०९ :- बृहन्मुंबई महापालिकेतर्फे कस्तुरबा रुग्णालयात ‘मेट्रोपॉलिटन सर्व्हिलन्स प्रयोगशाळा’ उभारण्यात येणार आहे. सर्व सुविधांनी अद्ययावत असलेली ही प्रयोगशाळा राज्य आणि केंद्र सरकारच्या समन्वयाने उभारण्यात येणार आहे.
महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मोफत वाचनालय उभारणार
महापालिकेच्या २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स प्रयोगशाळेची घोषणा करण्यात आली होती. ही प्रयोगशाळा ‘पंतप्रधान-आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन’अंतर्गत प्रस्तावित आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर – वंदे भारत ट्रेनचे उदघाटन
यासाठी मुंबई महानगरपालिका राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या प्रयोगशाळेत आजारांवर संशोधन करण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रयोगशाळेसाठी आवश्यक निधी केंद्र सरकारकडून महापालिकेला देण्यात येणार आहे.