महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मोफत वाचनालय उभारणार
ठाणे दि.०९ :- कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मोफत वाचनालय उभारण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आहे. या रुग्णालयानंतर महापालिकेच्या इतरही आरोग्यकेंद्रात वाचनालये सुरू करण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरु आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर – वंदे भारत ट्रेनचे उदघाटन
वाचनालयाचा उपक्रम ‘लेटस् रीड इंडिया’ या फाऊंडेशनच्या मदतीने राबविला जाणार असल्याचे बांगर यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गोरगरीब, मध्यमवर्गीय कुटुंबातील रुग्ण हे विविध उपचारांसाठी येत असतात. बाह्य रुग्ण कक्षात दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या सुमारे दीड हजारांच्या आसपास आहे.
त्यामुळे उपचारासाठी रुग्णांना आणि त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकाला तसेच उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांच्या सोबत असलेल्या व्यक्तींच्या वेळेचा सदुपयोग होण्यासाठी वाचनालयाचा निश्चितच उपयोग होईल, असा विश्वासही बांगर यांनी व्यक्त केला.