मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांसाठी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष
मुंबई दि.०९ :- मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली कामे आणि त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने स्वीकारण्यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सचिवालय कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली.
संसर्गजन्य आजारांवर संशोधन करण्यासाठी महापालिकेतर्फे प्रयोगशाळेची उभारणी
सर्वसामान्य जनतेला यापूर्वी मुख्यमंत्र्यांना अर्ज करण्यासाठी मंत्रालयात जावे लागत होते. आता राज्य शासनाने मुख्यमंत्री सचिवालयाचा कक्ष हा जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु केला आहे.
महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मोफत वाचनालय उभारणार
मुंबईतील ज्या नागरिकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार अर्ज/निवेदने द्यावयाची असतील त्यांनी ती जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई शहर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.