राज्याचा अर्थसंकल्प येत्या ९ मार्चला सादर होणार
अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारी ते २५ मार्च
मुंबई दि.०८ :- राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन यंदा २७ फेब्रुवारी ते २५ मार्च या कालावधीत होणार आहे. ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. बुधवारी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
‘म्हाडा’ सोडतीच्या नोंदणीला चांगला प्रतिसाद
अधिवेशनात राज्याचा २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प गुरुवार, ९ मार्च २०२३ रोजी मांडला जाणार आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हा अर्थसंकल्प सादर करतील.
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत ‘वंदे मातरम्’ नंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्य गीत वाजविणार
या बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानसभा अध्यक्ष,अँड राहुल नार्वेकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार छगन भुजबळ, अशोक चव्हाण, जयंत पाटील, ॲड.आशिष शेलार, अमीन पटेल उपस्थित होते.