‘म्हाडा’ सोडतीच्या नोंदणीला चांगला प्रतिसाद
मुंबई दि.०८ :- ‘म्हाडा’ सोडतीच्या कायमस्वरूपी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली असून गेल्या महिन्याभरात नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत सुमारे ९९ हजार २४८ इच्छुकांनी नोंदणी केली आहे.
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत ‘वंदे मातरम्’ नंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्य गीत वाजविणार
‘म्हाडाने ‘एक सोडत एक नोंदणी’ सुविधा अर्जदारांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता प्रत्येक सोडतीसाठी वेगळी नोंदणी करण्याची गरज नाही. ही नोंदणी प्रक्रिया वर्षानुवर्षे सुरू राहणार आहे.
बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत निकाल लागल्यानंतरच निवडणूक चिन्हाविषयी निर्णय व्हावा- उद्धव ठाकरे
त्यामुळे सोडत जाहीर होवो न होवो इच्छुकांना नोंदणी करता येणार आहे. मात्र इच्छुकांना नोंदणी करताना आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. ५ जानेवारी रोजी नोंदणी सुरू झाली असून ८ फेब्रुवारीपर्यंत उपरोक्त नोंदणी झाली आहे.