मनोरंजन

गाथा नवनाथांची मालिकेत आता ‘भर्तरीनाथ’ यांची जन्मकहाणी सुरू होणार

मुंबई दि.०८ :- सोनी मराठी वाहिनीवरील ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेतून नाथ संप्रदाय आणि त्याविषयीची माहिती प्रेक्षकांना मिळते आहे. मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ या नाथांच्या कथा प्रेक्षकांनी आत्तापर्यंत पाहिल्या.

राज्याचा अर्थसंकल्प येत्या ९ मार्चला सादर होणार

मालिकेत आता सूर्यपुत्र म्हणून मानले जाणारे ‘भर्तरीनाथ’ यांची जन्मकहाणी पुढे सुरू होणार आहे. भर्तरीनाथ यांचा जंगलातला जन्म, जंगलातलं बालपण, त्यानंतर सर्वसामान्य दाम्पत्यानी त्यांचा केलेला सांभाळ; हा सगळा प्रवास मालिकेत बघता येणार आहे.

‘म्हाडा’ सोडतीच्या नोंदणीला चांगला प्रतिसाद

भर्तरीनाथ यांनी पत्नीच्या मृत्यूनंतर घेतलेला संन्यास, नाथ संप्रदायातला प्रवेश, उज्जैन इथलं कार्य तसंच वैराग्यशतक , शृंगारशतक , नीतिशतक अशा तीन ग्रंथांचे लेखन हा जीवनप्रवासही मालिकेत मांडण्यात येणार आहे. ‘गाथा नवनाथांची’ ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर संध्याकाळी साडेसहा वाजता प्रसारित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *