‘मुख्यमंत्री फेलोशिप’साठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई दि.०८ :- युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या ‘मुख्यमंत्री फेलोशिप’ कार्यक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मार्च आहे.
मुंबईतील कोळीवाड्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यातील युवकांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव देत त्यांच्यातील ऊर्जा, धाडस, कल्पकता आणि तंत्रज्ञानातील गतीचा उपयोग करून प्रशासकीय प्रक्रियांना गती देणे, नावीन्यपूर्ण संकल्पना राबविणे हा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मुख्यमंत्री फेलोशिप २०२३ करीता अर्ज करण्यासाठी वय २१ ते २६ वर्षे दरम्यान असावे. ६० टक्के गुणांसह पदवी व एक वर्षाचा कामाचा अनुभव, असे किमान निकष आहेत. ऑनलाइन परीक्षा, निबंध व मुलाखत अशा त्रिस्तरीय चाचणीच्या माध्यमातून गुणवत्तेच्या आधारे निवड केली जाणार आहे.
राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्र संघ राैप्यपदकाचा मानकरी
आलेल्या अर्जांमधून ६० युवकांची निवड केली जाणार असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाचे विविध विभाग व राज्यभरातील विविध कार्यालयांमध्ये त्यांना काम करावे लागणार आहे. आयआयटी, मुंबई व आयआयएम, नागपूर हे या कार्यक्रमाचे संस्थात्मक भागीदार आहेत. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची सविस्तर माहिती http://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIPया संकेतस्थळावर मिळू शकेल. तसेच cmfellowship-mah@gov.inया ईमेल वर किंवा ८४११९६०००५ या मदत क्रमांकावरही संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.