बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत निकाल लागल्यानंतरच निवडणूक चिन्हाविषयी निर्णय व्हावा- उद्धव ठाकरे
मुंबई दि.०८ :- बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतरच केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण कुणाचा?, यावर निर्णय घ्यावा, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली.
‘मुख्यमंत्री फेलोशिप’साठी अर्ज करण्याचे आवाहन
तसेच, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख पदाची निवडणूक घेऊ द्यावी, असेही आवाहनही त्यांनी केले. दुसऱ्या शिवसेनेला मी मानत नाही. राज्यात शिवसेना एकच आहे. केवळ निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष नसतो.
मुंबईतील कोळीवाड्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिवसेनेची एक घटना आहे. त्या घटनेवर पक्ष चालतो. केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर पक्षाचे भवितव्य ठरत असेल तर उद्या कुणीही पैशांच्या जोरावर लोकप्रतिनिधींना खरेदी करून थेट पक्षावर दावा ठोकू शकतो, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.