ठळक बातम्या

माता रमाई यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीवर्ष रिपाइंतर्फे साजरे करणार -रामदास आठवले

नवी दिल्ली दि.०७ :- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी रिपब्लिकन पक्षातर्फे देशभर साजरे करण्यात येईल, अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे केली.

‘गोबेल्स नीती’चा अवलंब करणा-या ‘बीबीसी’ला धडा शिकवावा- अभय वर्तक

रमाबाई आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त नवी दिल्ली येथील निवासस्थानी आठवले यांनी माता रमाई यांच्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

पदपथावरील अतिक्रमणे हटवून ते चालण्यायोग्य करा

माता रमाई यांनी आयुष्यभर डॉ बाबसाहेब आंबेडकर यांची  सावली होऊन जीवन समर्पण केले. दलित, बहुजन समाजाच्या त्या माऊली झाल्या. माता रमाई यांचे योगदान प्रेरणादायी आहे असेही आठवले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *