ठळक बातम्या

‘गोबेल्स नीती’चा अवलंब करणा-या ‘बीबीसी’ला धडा शिकवावा- अभय वर्तक

मुंबई दि.०७ :- ‘गोबेल्स नीती’चा अवलंब करणा-या ‘बीबीसी’च्या ‘डॉक्युमेंट्री’वर फक्त बंदी आणून चालणार नाही, तर देशातील राष्ट्रभक्त नागरिकांसह सर्व संघटनांनी मिळून ‘बीबीसी’ला धडा शिकवायला हवा, असे प्रतिपादन ‘सनातन संस्थे’चे धर्मप्रचारक अभय वर्तक यांनी केले. हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित ‘भारतविरोधी ‘बीबीसी’चा हिंदूद्वेष’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होेते.

पदपथावरील अतिक्रमणे हटवून ते चालण्यायोग्य करा

ज्या ब्रिटिशांनी भारताची संपत्ती लुटली, आपला कोहिनूर हिरा चोरला, अशा चोर ब्रिटिशांचा प्रचार करणारी ही वृत्तवाहिनी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २००२ च्या गुजरात दंगलीविषयी सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष ठरविले असल्याचे सांगून वर्तक म्हणाले, तरीही गुजरात दंगलीविषयी मोदी यांना जबाबदार धरून त्यावर ‘बीबीसी’ने केलेली ‘डॉक्युमेंट्री’ हा केवळ त्यांच्यावरील नव्हे तर हिंदूंवरील हल्ला म्हणून पाहायला हवे.

मुंबई सागरी किनारा मार्गाला लता मंगेशकर यांचे नाव नको!

‘भारताच्या फाळणीच्या वेळी हिंदू स्त्रिया आणि भगिनी यांच्यावर झालेले अत्याचार’, ‘मोपला हत्याकांड’, ‘हिंदूंच्या मंदिरांचा विध्वंस’ या विषयांवर ‘बीबीसी’ कधी ‘डॉक्युमेंट्री’ करणार नाही. भारताचे पुन्हा विभाजन व्हावे, भारत हिंदु राष्ट्र घोषित होऊ नये आणि भारताची प्रगती होऊ नये, यासाठी भारतविरोधी शक्ती कार्यरत असून ‘बीबीसी’ हा त्यांचा चेहरा आहे, असेही वर्तक म्हणाले. कर्नाटक येथील पत्रकार श्रीलक्ष्मी राजकुमार म्हणाल्या, ‘बीबीसी’च्या ‘डॉक्युमेंट्री’मध्ये मोदींवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. हे प्रश्न चिन्ह केवळ मोदींवर नसून भारताच्या जनतेवरही आहे. ‘बीबीसी’ला चीनच्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *