ठळक बातम्या

श्रमप्रतिष्ठा लयाला गेल्यामुळे बेरोजगारी वाढली – सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

मुंबई दि.०६ :- आपल्या देशात श्रमप्रतिष्ठा लयाला गेल्यामुळे बेरोजगारी वाढली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले. रोहिदास समाज पंचायत संघ आणि वसुधा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.

शिक्षण क्षेत्रातील अमुलाग्र बदलास शिक्षकांनी स्वतःला तयार करावे – श्रीकांत पावगी

संत रोहिदास महाराज यांच्यावर बोलायला मिळणे हे आपले भाग्य असल्याचे सांगून भागवत म्हणाले, धर्माने वागून आपण जगाचे कल्याण करू शकतो, हा विश्वास ६०० वर्षांपूर्वी संत रोहिदास यांनी समाजात जागविला. ‘सर्वाभूती एकच’ हे तत्व आपण विसरलो त्यामुळे स्वार्थ मोठा झाला आणि त्याचा फायदा परकीय आक्रमकांनी घेतला.

कचऱ्याच्या विल्हेवाटीचा गंभीर प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा पुढाकार

वैयक्तिक स्वार्थामुळे चुकीच्या रूढी परंपरा अस्तित्वात आल्या. त्यामुळे समाजात उच्चनीचता अस्तित्वात आली, श्रमप्रतिष्ठा लयाला गेली. त्याचे दुष्परिणाम आज आपण बघतो आहोत. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. कामाच्या स्वरुपाचा विचार न करता त्याचा आदर करण्याचे आवाहनही भागवत यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *