शिक्षण क्षेत्रातील अमुलाग्र बदलास शिक्षकांनी स्वतःला तयार करावे – श्रीकांत पावगी
डोंबिवली दि.०६ :- काही वर्षांपूर्वी बँकिंग क्षेत्रात संगणकीकरणामुळे अमुलाग्र बदल झाले ते क्षेत्र कायमचे बदलले, तितकेच महत्वाचे बदल शिक्षण क्षेत्रात होत आहेत, त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि शिक्षकांनी स्वतःला या बदलासाठी प्रशिक्षित करावे, असे प्रतिपादन टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीकांत पावगी यांनी केले.
विद्याभारती कोकण प्रांताने आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. टिळकनगर विद्या मंदिर, डोंबिवली येथे झालेल्या या कार्यशाळेत पूर्व प्राथमिक व प्राथमिक २६ शाळांतील १३५ शिक्षक सहभागी झाले होते.
डोंबिवली ब्राह्मण उद्योजक समूहाच्या व्यावसायिक डिरेक्टरीचे प्रकाशन
कार्यशाळेत विद्या भारतीचे उपाध्यक्ष प्रशांत आठल्ये, प्रांत मंत्री संतोष भणगे, भावनाताई गवळी तसेच इतर अनेक तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
कृती – खेळ यांच्या माध्यमातून शिक्षण , अनुभवाधारित शिक्षण, पंचाकोश विकसन आदी संकल्पना विस्ताराने समजावून देण्यात आल्या. आगामी काळात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असणाऱ्या अनेक कौशल्यांची माहिती शिक्षकांना देण्यात आली.