ठळक बातम्या

भारतीय नौदलाची ‘टी-८०’युध्दनौका खाडी किनारी दाखल

कडोंमपाच्या नियोजित नौदल संग्रहालयात विराजमान होणार

कल्याण दि.०६ :- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत दुर्गाडी किल्ला खाडी किनारी नौदल संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या संग्रहालायत भारतीय नौदलाची ‘टी-८०’ही युध्दनौका ठेवण्यात येणार आहे. रविवारी ही युद्धनौका दुर्गाडी किल्ला खाडी किनारी दाखल झाली.

श्रमप्रतिष्ठा लयाला गेल्यामुळे बेरोजगारी वाढली – सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या आरमाराची स्थापना कल्याण येथे केली होती. महाराजांची दूरदृष्टी आणि पराक्रमाची साक्ष म्हणून कल्याणच्या खाडी किनारी शिवकाळापासून ते आतापर्यंतच्या आरामाराचे दर्शन देणारे एखादे संग्रहालय असावे, अशी संकल्पना कडोंमपाचे माजी आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांनी मांडली होती. नौदलाकडून याला मंजुरी देण्यात आली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये महापालिका आणि नौदल यांच्यात टी-८० ही निवृत्त युध्दनौका या संग्रहालयासाठी हस्तांतर करण्याच सामंजस्य करार झाला.

शिक्षण क्षेत्रातील अमुलाग्र बदलास शिक्षकांनी स्वतःला तयार करावे – श्रीकांत पावगी

विद्यमान महापालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे, प्रकल्प अभियंता तरुण जुनेजा, माजी आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांनी नौदल अधिकारी रिअर ॲडमिरल ए. एन. प्रमोद, कमांडर जीलेट कोशी यांच्याकडून कुलाबा येथे नौदल तळावर टी-८० युध्दनौकेचा स्विकारली. महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीकडून या प्रकल्पाची आखणी, नियोजन आणि खर्च केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *